LATEST NEWS

युवा क्रांती पोलिस मित्र* *फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या* *नियुक्त्यांची घोषणा*

By AMAR SHIVAJI PATARE • 2026-06-01 20:50 • 3 views   Share WhatsApp Share Facebook Share X
युवा क्रांती पोलिस मित्र* *फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या* *नियुक्त्यांची घोषणा*
*युवा क्रांती पोलिस मित्र* *फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या* *नियुक्त्यांची घोषणा* मुंबई, कांदिवली | प्रतिनिधी : अमर पठारे | दि. १ जून २०२६ मालाड पश्चिम येथील मराठी शाळेत युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीमध्ये शिर्डी वर्धापनदिन कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या सभासदांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे प्रमाणपत्र (Certificate) प्रदान करण्यात आले व पदाधिकारी तसेच सदस्यांना ओळखपत्रांचे (ID Card) वाटप करण्यात आले. युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवत असून त्याच कार्याचा एक भाग म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांद्रेकर यांची महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच सौ. जसविंदर सिंग राणा मॅडम यांची मुंबई महिला उपाध्यक्षा व ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या मुंबई महिला संपर्कप्रमुखपदी सन्माननीय संजना ताई पेलणकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ, महाराष्ट्र राज्य व मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांद्रेकर, मुंबई युवा अध्यक्ष श्री. कुणाल शहा, मुंबई महिला उपाध्यक्षा व ठाणे जिल्हा प्रभारी सौ. जसविंदर सिंग राणा, मुंबई सचिव श्री. सोहराब मुजावर, मुंबई महिला सचिव सौ. सुरेखा मेहेर, मुंबई महिला उपाध्यक्षा सौ. स्मिता लोणकर, उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षा सौ. सुप्रियाताई पवार, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. विलास सावंत, कांदिवली पूर्व महिला तालुका कार्याध्यक्षा सौ. इरशाद शेख, कांदिवली पूर्व युवा तालुका उपाध्यक्ष ताहिर शेख, मालाड पश्चिम तालुका युवा सचिव अल्पेश जाधव, बोरीवली पूर्व तालुका उपाध्यक्ष श्री. भास्कर बोंबले, बोरीवली पूर्व तालुका महिला उपाध्यक्षा श्रीमती मिनाक्षी वाडेकर, मालाड पश्चिम संपर्कप्रमुख श्री. मंगेश मोरे, मिराभाईंदरच्या डॅशिंग नेतृत्व राधाताई शेट्टी यांच्यासह असंख्य सभासद उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संघटनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना कोणत्या प्रकारे मदत करता येईल आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक सदस्याने कसे योगदान द्यावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.