CRIME NEWS

महाराष्ट्र हादरला! ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नागरिकांनी आरोपीला दिला चोप

By AMAR SHIVAJI PATARE • 2026-04-05 18:03 • 3 views   Share WhatsApp Share Facebook Share X
महाराष्ट्र हादरला! ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नागरिकांनी आरोपीला दिला चोप
🟥 सनसनी खबर 🟥 महाराष्ट्र हादरला! ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नागरिकांनी आरोपीला दिला चोप वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील पारगोठाण परिसरात घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका ५ वर्षीय निरागस बालिकेवर ४५ वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका शौचासाठी घराबाहेर गेली होती. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान बालिका आरोपी गंगाधर धुर्वे याच्या ताब्यात आढळून आली. ही घटना समजताच संतप्त नागरिकांनी आरोपीला जागेवरच पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीवर POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. माहितीनुसार आरोपी हा ट्रक क्लीनर असून त्याच्या विक्षिप्त वागणुकीमुळे तो एकटाच राहत होता. सध्या जखमी बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती लक्षात ठेवून वैद्यकीय देखरेख केली जात आहे. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रिपोर्टर: अमर शिवाजी पठारे इंडियन प्रेस युनियन (IPU)