LATEST NEWS

आमदार सीमा हिरे यांनी कोठावदे कुटुंबाची भेट घेतली

By AMAR SHIVAJI PATARE • 2026-05-30 11:36 • 3 views   Share WhatsApp Share Facebook Share X
आमदार सीमा हिरे यांनी कोठावदे कुटुंबाची भेट घेतली

नाशिक | प्रतिनिधी अमर पठारे

सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथील कोठावदे कुटुंबावर अलीकडेच दुहेरी कौटुंबिक संकट ओढवले आहे. कुटुंबातील प्रमुख सदस्य निलेश कोठावदे यांच्या निधनानंतर काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले.

या पार्श्वभूमीवर किरण कोठावदे यांनी आमदार सीमा हिरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून कुटुंबाची परिस्थिती मांडली. त्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

शासकीय लाभार्थी समितीच्या अध्यक्षा जयश्री वाघ आणि युवाली देशमुख यांनीही कोठावदे कुटुंबाची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. यावेळी किरण कोठावदे यांच्या मुलगा संकेत याला ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ अंतर्गत शैक्षणिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

तसेच विधवा सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर पात्र शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.

कुटुंबाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.