LOCAL NEWS

खराडी परिसरात गार्डन व व्यायामासाठी जागा देण्याची मागणी

By AMAR SHIVAJI PATARE • 2026-04-03 11:18 • 3 views   Share WhatsApp Share Facebook Share X
खराडी परिसरात गार्डन व व्यायामासाठी जागा देण्याची मागणी
पुणे | प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री मधून प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक सुविधांची कमतरता भासत असल्याचे चित्र समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर खराडी परिसरात गार्डन व व्यायामासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अमृता पठारे यांनी पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे याबाबत निवेदन सादर केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, खराडी परिसरात नागरिकांसाठी मोकळी जागा राखीव ठेवून ती गार्डन व व्यायामासाठी विकसित करण्यात यावी. सदर जागा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी तसेच नागरिकांना योगा व व्यायामासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सध्या या परिसरात अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोकळ्या जागेची कमतरता जाणवत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गार्डनची अत्यंत गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे संबंधित जागा कायमस्वरूपी राखीव ठेवून ती विकसित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आता पुणे महानगरपालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 🖊️ Reporter: अमर शिवाजी पठारे इंडियन प्रेस युनियन (IPU)