LATEST NEWS

*पत्रकारांनो दावणीला बांधलेली लेखणी तोडा — नाहीतर “पत्रकार” नाव गाडून टाका!*

*पत्रकारांनो दावणीला बांधलेली लेखणी तोडा — नाहीतर “पत्रकार” नाव गाडून टाका!*
🙏*जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय आदिवासी*🙏 *पत्रकारांनो दावणीला बांधलेली लेखणी तोडा — नाहीतर “पत्रकार” नाव गाडून टाका!* ✍️ *लेखक, पँथर, पत्रकार चंद्रकांत जगधने* पत्रकारिता ही क्रांतीची ठिणगी आहे, पण आज अनेकांनी त्या ठिणगीवर पाणी ओतून तिला राख करून टाकलं आहे. नाव *पत्रकार* , पण काम? सत्तेच्या दारात उभं राहून मान डोलवणं. सत्य गाडणं, खोटं सजवणं, आणि जनतेला अंधारात ठेवणं. ही पत्रकारिता नाही ही सरळ गुलामी आहे, आणि तीही स्वेच्छेने स्वीकारलेली. सरळ बोला तुमची लेखणी अजून जिवंत आहे का, की ती कोणाच्या दावणीला बांधली आहे? तहसीलच्या टेबलाला? पोलीसांच्या खाकीला? पंचायत समितीच्या फाईलला? की एखाद्या राजकीय नेत्याच्या खुर्चीला? उत्तर द्या पत्रकारिता स्वतंत्र आहे का, की ती सत्तेच्या साखळदंडात अडकली आहे? आज परिस्थिती अशी आहे की भ्रष्टाचार उघड्यावर नाचतोय, पण तुमच्या कागदावर शांतता आहे. का? कारण *सेटिंग* आहे. *फोन* येतो. *ऑर्डर* येते. आणि मग तुमची लेखणी थरथरते, वाकते, आणि शेवटी विकली जाते. *ही लेखणी आहे का भाड्याने दिलेला आवाज*? अधिकाऱ्यांचा उदो-उदो, नेत्यांची स्तुती, फोटोसेशन, वाढदिवस, बडती हाच का तुमचा पत्रकारिता धर्म?जनतेच्या जखमा कुठे आहेत? शेतकऱ्याचा आक्रोश कुठे आहे? सामान्य माणसाचा आवाज कुठे आहे? की तो आवाज तुमच्या पानावर बसत नाही कारण त्यात *फायदा* नाही? आजची आणखी एक कटू सत्यता अनेक पत्रकार *सोयीचे सत्य* निवडतात. जिथे धोका नाही, तिथे मोठमोठ्या हेडलाईन्स; जिथे खरा प्रश्न आहे, तिथे शांतता. कठीण प्रश्न टाळले जातात, सोपे विषय फुगवले जातात. ही भ्याडपणा नाही तर पत्रकारितेची गळचेपी आहे. भीती, लोभ आणि ओळखींच्या जाळ्यात अडकलेली लेखणी समाजाला दिशा देत नाही ती समाजाला भरकटवते. *मी* *, पॅंथर पत्रकार चंद्रकांत जगधने, हे* *सरळ सांगतो हा प्रहार तुमच्यावर* *आहे, पण त्यात मीही* *सुटत नाही.* *जर* *माझी लेखणीही कुठे झुकत असेल* , *कुठे थांबत असेल, कुठे गप्प बसत असेल तर हा प्रश्न माझ्यावरही तितकाच लागू होतो.* पण फरक इतकाच *मी* *स्वतःला विचारतो* , *तुम्ही विचारता का?* तुम्ही पत्रकार आहात की *दलाल?* तुम्ही सत्याचे सैनिक आहात की सत्तेचे नोकर? तुमची निष्ठा जनतेशी आहे की *पैशाशी?* पत्रकार या शब्दात आग आहे पण आज ती आग *विझवून तुम्ही धूर विकत* *आहात* . तुमची लेखणी तलवार असायला हवी होती, पण ती आता साखळी झाली आहे कुणाच्या तरी हातात अडकलेली. *राजकीय नेत्यांच्या दावणीला पत्रकारिता* *बांधली आहे का?* *अधिकाऱ्यांच्या टेबलावर तुमची लेखणी ठेवली आहे का?* *फोन येतो आणि बातमी मरते हे खरं नाही का?* जर हे सगळं खरं असेल, तर मग सरळ बोला पत्रकारिता जिवंत नाही, ती *कोमात* आहे. आणि तुम्ही तिच्या भोवती उभे राहून फक्त नाटक करत आहात. *लेखणी विकली असेल तर नाव बदला.* *सत्य लिहायची हिंमत नसेल तर बाजूला व्हा*. *जनतेचा आवाज बनू शकत नसाल तर तिचं नाव तरी घेऊ नका.* ही वेळ आहे स्वतःला फाडून पाहण्याची. आरसा तोडण्याची नाही, तर त्यातलं कुरूप सत्य स्वीकारण्याची. *सत्य लिहा. जळा, पण झुका नका. भिडा* , *पण विकू नका.* *नाहीतर उद्या इतिहास निर्दयीपणे लिहील* *पत्रकार होते पण त्यांनीच पत्रकारितेला विकून टाकलं.* 🙏*जय भीम*🙏