LATEST NEWS

नव बौद्ध मित्र मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नव बौद्ध मित्र मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माजगाव पूर्व, रे रोड येथील दातार दर्गा गल्ली परिसरातील नव बौद्ध मित्र मंडळ येथे विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंगळवार, 14 एप्रिल 2026 रोजी विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात कला दर्पण नृत्य अकॅडमीच्या वतीने नृत्य, गीत आणि सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास वायाळ यांनी केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका देखील सादर करण्यात आली.

कला दर्पण नृत्य अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्री. दीपक तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी गायिका सौ. राखी तेंडुलकर यांनी आपली गीते सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिका श्री. दीपक देवळे यांनी साकारल्या. त्यांना श्री. अमित शिवलकर यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक केले.