LATEST NEWS

कुळेनांदगाव वासीय पक्का रस्ता बनन्याच्या प्रतीक्षेतच... शासनाचे दुर्लक्ष.

By AMIT HIRAMAN ALONE • 2026-05-05 11:04 • 3 views   Share WhatsApp Share Facebook Share X
कुळेनांदगाव वासीय पक्का रस्ता बनन्याच्या प्रतीक्षेतच... शासनाचे दुर्लक्ष.
कुळेनांदगाव हे गाव गोंडपिपरी तालुक्यात येत असून, जंगला शेजारी गाव लागलेला आहेत. मागील 5 पाच वर्षांपासून पक्का रस्ता बनलेला नसून, पावसाळ्यात शेतकऱ्यांना, शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर मोठे मोठे दगळ बाहेर निघालेले आहेत. कुणी बिमार पडल्यास, काळज हातात घेऊन जावे लागते. राष्ट्रीय मानवाधिकार न्याय आयोग चे जिल्हा अध्यक्ष अमित अलोणे आज दिनांक 3 मे ला पाहणी केली असता. रस्त्याची दुर्दशा त्यांच्या लक्ष्यात आली.. त्यांनी लगेच गावाकऱ्यांना भेट देऊन माहिती घेतली असता.. 5 वर्ष्यापासून चेकनांदगाव ते कुळे नांदगाव रस्त्याकडे शासनाने लक्षच दिले नाही. असे गावकर्यांनी सांगितले. गावकर्यांनी शासनाकडे पक्या रस्त्याची मागची करत आहेत. याकडे शासनाणे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.कुळेनांदगाव हे गाव 70 घराची वस्ती आहे. त्यात पाण्याचे साधन सुद्धा अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सोबतच दळणवळणासाठी रस्त्याची सोय अपूर्णच राहिली आहे. वारंवार संबंधित विभागात गावकर्यांनी निवेदने देऊन सुद्धा, मागील 5 वर्षांपासून एकच एकायला मिळत आहे कि 'निधी मंजूर होऊन आहे, लवकरच रस्त्याचे कामकाज सुरु करू, अशी आशा स्थानिक प्रशासनाकडून गावाकऱ्यांना एकायला मिळत आहे. या बाबीकडे शासनाने कसून लक्ष द्यावे. अशी मागणी गावकरी करत आहेत.