LATEST NEWS

कळंब तहसील कार्यालयातील माजी पुरवठा अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागण

कळंब तहसील कार्यालयातील माजी पुरवठा अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागण

कळंब तहसील कार्यालयातील माजी पुरवठा अधिकारी श्रीमती शिल्पा माळवे यांच्या कार्यकाळातील काही प्रकरणांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नायब तहसीलदार पंडित जाधव यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी पथकाच्या अहवालात काही रेशनकार्ड अर्जांच्या मंजुरी प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात काही रेशनकार्ड मंजुरी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून हा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका किंवा प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली असून मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.