LATEST NEWS

" २३ - एप्रिल - वाचन संस्कृती दिन " माझं शिर्षक गीत " वाचाल तर वाचाल "

" २३ - एप्रिल - वाचन संस्कृती दिन " माझं शिर्षक गीत " वाचाल तर वाचाल "
[गुरुवार... 23 एप्रिल 2026 " २३ - एप्रिल - वाचन संस्कृती दिन " माझं शिर्षक गीत " वाचाल तर वाचाल " पवित्र कुरआन म्हणतो ," वाचा , आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे ,(३) ; ज्याने लेखनी द्वारे तुम्हाला ज्ञान शिकवलै ,(४) ;. मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता (५) .. ( " पारा नंबर:- ३० वा, सुराह नंबर ९६ सुराह अल - अलक आ.न.२- ते - ०५ ) प्रेषित मुहम्मद सल्लम ज्यावेळी चाळीसाव्या वर्षी अल्लाह ने पैगंबरी , प्रेषित, संदेश वाहक , मार्गदर्शक म्हणून घोषित केले, त्यावेळी हजरत मुहम्मद सल्लम हे " गार हिरा " मधे अल्लाह च्या उपासनेत( नामस्मरणात)तल्लीन होते , अचानक अल्लाह चे ईशदुत हजरत जिब्राईल ( जिब्राल्टर) अलै. येवून हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना जोरात "आलिंगन" देऊन मिठी मारून " इक्रा बिस्मिह रब्बुकूल लजी खलक" अर्थात:- " वाचा ( पढ) ,वाच( पढ) पढ अपने रब्ब के नाम से जिसने‌ पैदा किया '" प्रेषित मुहम्मद सल्लम हे निरक्षर ( उम्मी) ,होते ... अल्लाह ने आपल्या ईशदुता मार्फत पवित्र कुरआन चे पहिली आयात" शिका - शिका - शिका " अर्थात; वाचा- वाचा- वाचा " अरबांना शिक्षण नव्हते.. संपूर्ण अरब वाळवंट ठराविक लोकं च शिक्षीत होते .. म्हणून अल्लाहनेच त्याच दिवशी अंतिम प्रेषितत्व, पैंगंबरी , संदेश वाहक म्हणून घोषित केले... तेथूनच शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून संपूर्ण आयुष्यात प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी मेहनत खर्चि केले. प्रेषित मुहम्मद सल्लमांनी म्हणतात की," तुम्हाला ज्ञान ( शिक्षण) घेण्यासाठी चीन ला जाण्याची वेळ आली तरी जा " त्याकाळी चीन ज्ञानाच्या बाबतीत जास्त प्रगत होता. म्हणुनच म्हणतात की," वाचाल तर वाचाल" लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर ९२७१६४००१४. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 *Devashish Govind Tokekar* *INDIAN PRESS UNION* *District Reporter*